बंद

    प्रस्तावना

    राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रहिवासी असलेल्या राजपूत समाजातील लोकांना आर्थिक पाठबळ मिळावे तसेच या समाजाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी आहे. राजपूत समाजातील घटक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. या समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी अर्थपुरवठा होवून बेरोजगारी कमी होवून समाजाचा आर्थिक स्तर सुधारणे आवश्यक आहे. यासाठी राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.